तुमचेही व्हॉट्सअॅप होऊ शकते बंद!

14 Feb 2019 17:37:14


 
 
 
आंध्र प्रदेश : व्हॉट्सअॅपवर काही गोष्टी कटाक्षाने टाळा, नाहीतर तुमचेही व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होऊ शकते. तेलुगू देसम पक्षाचे राज्यसभेतील खासदार सी.एम.रमेश यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट अचानक बंद झाले आहे. रमेश यांच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून ही कारवाई थेट व्हॉट्सअॅप कंपनीकडून करण्यात आली. असे रमेश यांचे म्हणणे आहे. “माझ्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर कोणाचाही मॅसेज येत नाही. तसेच माझ्याकडूनही कोणालाही मॅसेज जात नाही.” असे रमेश यांनी सांगितले. व्हॉट्सअॅप सारख्या मोठ्या कंपनीकडून जर एका खासदाराचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद केले जाऊ शकते. तर एखाद्या सामान्य व्यक्तीसोबतही हे घडू शकते. व्हॉट्सअॅपने आता आपले नियम कडक केले असून व्हॉट्सअॅप वापरताना काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
 

भावना भडकवणारे, अश्लील, कोणाचा अपमान करणारे मॅसेजेस व्हॉट्सअॅपवर पाठविल्यास व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते.

 

एखाद्या गुन्ह्याचे समर्थन करणारे मॅसेजेस व्हॉट्सअॅपवर पाठविल्यास व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होऊ शकते.

 

दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने व्हॉट्सअॅप अकाऊंट बनविले आणि ते वापरले तरीदेखील तुमचे व्हॉट्सअॅप अकांऊट ब्लॉक होण्याची शक्यता आहे.

 

एखाद्या अनोळखी व्यक्तीला सतत मॅसेज करत राहिल्यास व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद केले जाईल.

 

व्हॉट्सअॅपचे सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा दुसऱ्या एखाद्या व्हॉट्सअॅप यूजरवर नजर ठेवल्यास तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होऊ शकते.

 

व्हॉट्सअॅपच्या कोडिंगमध्ये छेडछाड केल्यास किंवा काही बदल केल्यास तुमचे अकाऊंट बॅन केले जाण्याची शक्यता आहे.

 

व्हॉट्सअॅप यूजर्सच्या मोबाईलमध्ये व्हायरस जाईल. अशी लिंक पाठविणाऱ्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर त्वरित कारवाई केली जाईल.

 

एखाद्या धर्माविषयी किंवा एखाद्या धार्मिक स्थळाविषयी द्वेष पसरवणारा मॅसेज पाठविल्यास ते व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद करण्यात येईल.

 

तुमच्याविरोधात व्हॉट्सअॅप कंपनीकडे तक्रार करण्यात आली असेल तर तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

 

व्हॉट्सअॅप प्लससारखे थर्ड पार्टी अॅप्लिकेशन वापरले तर त्या व्यक्तीचे मूळ व्हॉट्सअॅप अकाऊंट कंपनीकडून बंद करण्याची शक्यता आहे.

 
 

माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0