आता खाद्यपदार्थांसह स्वीगी करणार ‘या’ सामानाचीही डिलीव्हरी

14 Feb 2019 19:02:07

 

 
 
 
नवी दिल्ली : ऑनलाईन फूड ऑर्डरिंग आणि फूड डिलीव्हरी अॅप स्वीगीने नुकतेच आपले स्वीगी स्टोअर लाँच केले आहे. ११ फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वीगी स्टोअर लाँच करण्यात आले. आता फूड डिलीव्हरी सोबतच वाणसामान, भाज्या, फळे, फुले, औषधे आणि बेबी केअर प्रोडक्ट्स सारख्या वस्तूंची डिलीव्हरी करण्यास स्वीगीने सुरुवात केली आहे. २०१४ साली स्वीगीने फूड डिलीव्हरीची सुविधा देण्यास सुरुवात केली होती.
 

स्वीगी आपल्या ग्राहकांना ६० हजार रेस्टॉरंट्सशी जोडते. देशभरातील ८० शहरांमध्ये स्वीगी या फूड डिलीव्हरी अॅपची सेवा दिली जाते. स्वीगी स्टोअरद्वारे नवीन उद्योजकांना आपले सामान जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची, तसेच नवीन ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्वीगी स्टोअरद्वारे स्वीगीला उत्पन्नाचा एक नवा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.

 

आजवर स्वीगी आपल्या ग्राहकांना खाद्यपदार्थ देत आले. आता इतर वस्तूंची डिलीव्हरीही सुरु करणार असून त्याद्वारे ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्याप्रमाणे स्वीगी खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करून ग्राहकांना आनंददायी अनुभव देते. त्याचप्रमाणे वस्तूंच्या डिलीव्हरीद्वारेदेखील तसाच समान अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. असे स्वीगीचे सीईओ श्रीहरशा मजेटी यांनी सांगितले. शहरातील लोकांची जीवन गुणवत्ता सुधारता यावी. यासाठी कंपनीने आपल्या दृष्टीक्षेपात वाढ केली आहे. स्वीगीसाठी हा पहिला मैलाचा दगड असेल. असेही श्रीहरशा मजेटी यांनी म्हटले.

 
 

माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0