मोदीच पुढील पंतप्रधान व्हावेत - मुलायमसिंह यादव

13 Feb 2019 17:36:05


 


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत बोलताना दिल्या आहेत. यामुळे मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मोठा चर्चेचा ठरला. यावेळी मुलायमसिंह म्हणाले, लोकसभेत आमचे खासदार मोठ्या संख्येने निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, तुमचे सर्व खासदार पुन्हा निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत."

 

मुलायमसिंह यांनी दिलेल्या शुभेच्छांचा पंतप्रधानांनी हाथ जोडून स्वीकार केला. तर भाजपाप्रणित सरकारच्या सर्व खासदारांनी याला बाके वाजवून साथ दिली. पंतप्रधान मोदींनी मागील पाच वर्षात चांगली कामे केली आहेत. आम्हा सर्व खासदारांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच आम्हा सर्वांना त्यांनी नेहमीच मदत केली. यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. असे सांगताना मुलायमसिंह यांनी पंतप्रधान मोदींना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0