
सारागढीच्या युद्धातील एक छोटासा प्रसंग यातील एका टीझरमध्ये दाखविण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘केसरी’ सिनेमाचे हे दोन्ही टीझर अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. “या वर्षाची सुरुवात मी ‘केसरी’ या सिनेमाने करत आहे. यावेळी माझ्या मनात अभिमानाशिवाय इतर कोणतीच भावना नव्हती. माझ्या या आतापर्यंतच्या सर्वात महत्वाकांक्षी सिनेमासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.” असे म्हणत अभिनेता अक्षयकुमारने या सिनेमासाठी आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा, मागितल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी ‘केसरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करताना अक्षयने हे कॅप्शन लिहिले होते. अभिनेता अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोप्राची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. “भारतीय सैन्यदलाच्या आजवरच्या इतिहासात सारागढीच्या युद्धाचे अनेक उल्लेख पाहायला मिळतात. इतिहासात आजवर लढलेले हे सर्वात धाडसी युद्ध होते.” असे अभिनेता अक्षय कुमारने या सिनेमाविषयी सांगितले. येत्या २१ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/