नवी दिल्ली : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीधीनिमित्त भाजपतर्फे समर्पण दिवस घोषित केला आहे. ११ ते १५ फेब्रुवारीपर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर समर्पण दिवस साजरा केला जाणार आहे. पंडित दीनदयाल यांच्यापासून प्रेरणा घेत सामाजिक जीवनातील प्रामाणिकपणा जपत हा दिवस साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारताच्या राजकारणात भाजपकडून एक वेगळी मोहिम उभारण्यात येत आहे. यात राजकारणासाठी स्वच्छ आणि प्रामाणिकपणे मदत करू इच्छिणाऱ्यांनी पक्षाला स्वेच्छा निधी द्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तुम्ही तुमची मदत थेट नमो अॅपद्वारेही करू शकता, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाला केलेल्या मदतीचा ट्विट करून त्यांनी पक्षाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारतातील पक्षांना केलेली आर्थिक मदतीबद्दल आयकरातून सेक्शन ८० जीजीबीमध्ये कंपन्यांना आणि ८० जीजीसी अंतर्गत इतरांना सवलत देण्यात येते. नरेंद्र यांनी केलेल्या ट्विटनंतर ट्विटरवर समर्पण दिवस या हॅशटॅगवर पंडित दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन आणि नमो अॅपद्वारे केलेल्या मदतीचे ट्विट करण्यात आले आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/