कुलगाम येथे चकमकीत ५ दहशवाद्यांना कंठस्नान

10 Feb 2019 15:45:25



कुलगाम - जिल्ह्यात केल्लम देवसार परिसरात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या परिसरात जोरदार दगडफेक सुरू असून काही जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सुरक्षा दलांकडून दहशवाद्यांची शोध मोहीम सुरू असताना सकाळपासून चकमक सुरू झाली होती. अद्याप कारवाई सुरू आहे. २६ जानेवारीला श्रीनगरच्या सीमेवरील भागात झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार झाले होते. ५० राष्ट्रीय रायफल्स (आरआर), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि श्रीनगर पोलिसांद्वारे ही संयुक्त कारवाई झाली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0