सारामुळे कार्तिकचा चित्रीकरणास नकार !

09 Dec 2019 18:04:21

sara_1  H x W:


अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या कथित नात्याची चर्चा बी टाऊनमध्ये अनेक दिवस रंगली होती. इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ या चित्रपटाच्या सीक्वलच्या सेटवर ही जोडी खूप वेळा एकत्र दिसली. चित्रपटाच्या सेटवरील दोघांचेही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ते दोघे अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणांवर एकत्रही दिसले होते. कार्तिकही साराचा वाढदिवस साजरा करताना दिसला होता.

आता मात्र या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगत आहेत. मागे कार्तिकने सारासोबत फोटो काढण्यासाठी नकार दिल्याने या चर्चांना उधाण आले होते. मात्र नंतर त्यांनी सगळे काही सुरळीत सुरु असल्याचे म्हटले होते. मात्र या दोघांमध्ये मोठे अंतर पडलेले असून दोघांनाही आता भुतकाळावर बोलायचे नसल्याचे चित्र दिसत आहे. याच कारणामुळे कार्तिक आर्यनने चित्रपटातील एका प्रसंगाचे पुन्हा चित्रिकरण करण्यास नकार दिला आहे. या नकाराचे एकमेव कारण सारा हेच असल्याचेही बोलले जात आहे.

Powered By Sangraha 9.0