शिवसेना खासदारांची मोदी सरकारला साथ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

LS_1  H x W: 0



नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ठरावाच्या बाजूने २९३ जणांचे मतदान



नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. २९३ जणांनी या ठरावाच्या बाजूने मतदान करत या विधेयकाला पाठींबा दर्शवला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. या विधेयका विरोधात ८२ मते पडली. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेने यावेळी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. केंद्र सरकारमधून राजीनामा दिलेल्या अरविंद सावंत यांनीही मोदी सरकारला साथ दिली आहे.


 

 

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आले. विरोधी पक्षांनी याचा विरोध केला. मात्र, याला गृहमंत्री अमित शाह यांनी खडेबोल सुनावत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. "काँग्रेसने देशाच्या फाळणीदरम्यान देशाचे धर्माच्या आधारे विभाजन केले. मात्र, तसे झाले नसते तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक भाजप सरकारला मांडण्याची आवश्यकता भासली नसती," असा घणाघात शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केला.


 


 

अमित शाह म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडताना कुठल्याही प्रकारे संविधानाचे उल्लंघन झालेले नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमध्ये संविधानाने इस्लाम हा राज्याचा धर्म मानला आहे. तिथे हिंदू, शीख, जैन, ईसाई, बौद्ध, पारसी आदी धर्मीयांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे हे बिल आपण आज सादर करत आहोत. जर कुठल्या मुस्लीम व्यक्तींनी भारताकडे अशाप्रकारचा अर्ज सादर केला तर त्यावर खुलेपणाने विचार करू. मात्र, धार्मिक प्रतारणेच्या आधारे केलेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही." Citizenship Amendment Bill News 
@@AUTHORINFO_V1@@