"धर्माच्या आधारे काँग्रेसने देश विभागला नसता तर आज 'ही' वेळ आली नसती!"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019
Total Views |

AMit Shah _1  H



अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

 


नवी दिल्ली : लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आले. विरोधी पक्षांनी याचा विरोध केला. मात्र, याला गृहमंत्री अमित शाह यांनी खडेबोल सुनावत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. "काँग्रेसने देशाच्या फाळणीदरम्यान देशाचे धर्माच्या आधारे विभाजन केले. मात्र, तसे झाले नसते तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक भाजप सरकारला मांडण्याची आवश्यकता भासली नसती," असा घणाघात शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केला.


 

अमित शाह म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडताना कुठल्याही प्रकारे संविधानाचे उल्लंघन झालेले नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमध्ये संविधानाने इस्लाम हा राज्याचा धर्म मानला आहे. तिथे हिंदू, शीख, जैन, ईसाई, बौद्ध, पारसी आदी धर्मीयांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे हे बिल आपण आज सादर करत आहोत. जर कुठल्या मुस्लीम व्यक्तींनी भारताकडे अशाप्रकारचा अर्ज सादर केला तर त्यावर खुलेपणाने विचार करू. मात्र, धार्मिक प्रतारणेच्या आधारे केलेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही."
@@AUTHORINFO_V1@@