कर्नाटकमध्ये पुन्हा कमळ फुलले ! भाजपने जिंकले मैदान

09 Dec 2019 14:16:51


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : कर्नाटकामध्ये बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वालाच कर्नाटकच्या जनतेने कौल दिला आहे. कर्नाटकात नुकतेच १५ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. याचा निकाल सोमवारी लागला. यामध्ये भाजपने १२ जागांवर विजय मिळवला. १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला २ जागांवरच आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले.

  

येडियुरप्पा यांच्या सरकारला सत्ता टीकवण्यासाठी सहा जागा जिंकणे आवश्यक होते. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. तेव्हापासूनच भाजपने आघाडी घेतली होती. सध्या जाहीर झालेल्या सात जागांमधील सहा जागांवर भाजपने विजय मिळाला आहे. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला आता कोणताही धोका नाही. या विजयानंतर येडियुरप्पा यांच्या मुलाने त्यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला. कर्नाटकाचे निकाल समोर येत आहेत. काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, "या १५ मतदारसंघांमधील जनादेश आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्वीकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही." कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेत आले. मात्र आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या १५ जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले. 

Powered By Sangraha 9.0