देवेंद्र फडणवीस-अजितदादा पुन्हा एकत्र !

    दिनांक  08-Dec-2019 21:12:34
|

AJIT _1  H x W:सोलापूर : देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार पुन्हा एकत्र आले, त्यांनी तब्बल वीस मिनिटे चर्चा केली. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या चित्राने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सोलापूर येथील संजयमामा शिंदे यांच्या सुपूत्रांच्या विवाह सोहळ्याला दोघांनीही उपस्थिती लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी वीस मिनिटे एकमेकांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा नेमकी कुठली होती. त्याबद्दल तपशील कळू शकलेला नाही.
 

राज्यातील सरकारवर सध्या विरोधकांनी चोहोबाजूने हल्लाबोल सुरू केला आहे. रविवारी सकाळी भाजप खासदार नारायण राणे यांनी हे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पाहूणे असून फार काळ राहणार नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीला इशारा देत आम्ही फारकाळ विरोधी पक्षात बसणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यामुळे अजित पवार आणि फडणवीस यांच्या या भेटीवरून सध्या अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.