हैदराबाद चकमकी प्रकरणी सरन्यायाधीश बोबडे यांची 'ही' प्रतिक्रिया

    07-Dec-2019
Total Views |



bobade_1  H x W


राजस्थान
: 'न्याय कधीही सूडात बदलू नये. जर न्याय सुड भावनेत बदलत गेला तर न्यायालायचे पावित्र्य हरवेल. हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांवरील सामूहिक बलात्कारानंतर खुनाच्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस चकमकीत आरोपी ठार झाले. याप्रकरणी जोधपूरमधील राजस्थान उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश एस.ए. बोबडे बोलत होते.



दरम्यान
, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या न्याय प्रणालीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले," न्याय प्रक्रिया गरीबांच्या आवाक्याबाहेरची आहे." सी जे आय बोबडे म्हणाले, “देशात नुकत्याच होत झालेल्या घटनांमुळे अनेक जुन्या वादविवादाला आणखी तीव्रता मिळाली. फौजदारी न्यायप्रणालीने आपल्या निर्णय प्रक्रियांमध्ये घेतलेल्या वेळेबद्दलचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यात शंका नाही. परंतु, मला असे वाटत नाही की न्याय कधीही त्वरित मिळाला पाहिजे किंवा न्यायाचे सूडात रुपांतर केले जावे."



तुम्ही गांधीजींचे निकष पाळले तर योग्य मार्ग दिसेल’ : राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “आज कोणतीही गरीब किंवा असहाय माणूस आपल्या तक्रारीसह न्यायप्रक्रियेत सहभागी होऊ शकेल काय? हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पण घटनेच्या प्रस्तावनेत आम्ही सर्वांना न्याय देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रपती म्हणाले, "जर आपण गांधीजींच्या निकषांची काळजी घेतली आणि सर्वात गरीब आणि दुर्बल माणसाचा विचार केला तर आपणास योग्य मार्ग दिसेल."