'डू नॉट डिस्टर्ब' म्हणत ‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट टीझर प्रदर्शित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |
subodh_1  H x W

बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला. या टीजर मध्ये लग्न जमत नसलेला वसंत बापूसाहेब खाटमोडे हा युवक आपल्या मित्रांसोबत एका ज्योतिषाला आपला हात दाखवतोय, त्यावर तो ज्योतिष वसंताचा विवाह येत्या २० दिवसात होण्याचा बेत असल्याचे सांगतो. तर दुसरीकडे चित्रपटाच्या नायिकेची एंट्री होते आणि ती नायकाला 'आज बारीक दिसताय' म्हणते यावर 'आपल्या प्रेमाचा माणूस आपल्याला हमेशा बारीकचं दिसतो' असं उत्तर तो देतो. तर 'पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे' हे ज्योतिषाचे वाक्य या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारे आहे.




मायदेश मीडिया निर्मित 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटात प्रणव रावराणे, सायली संजीव यांच्यासह छाया कदम, संजय कुलकर्णी, नितिन दांडुके, विठ्ठल काळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'आटपाडी नाईट्स'च्या टीजर बरोबरच पोस्टरचीही चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगल्याचे दिसते. या पोस्टर मध्ये एक सुंदर सजावट केलेले हिरव्या रंगाचे बंद दार आहे, दाराच्या मध्यभागी शुभ विवाह लिहिलेले आहे, तसेच दारावर 'डू नॉट डिस्टर्ब' चा टॅग लावलेला आहे. या बंद दार मागची कथा प्रेक्षकांना येत्या २७ डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@