जया बच्चन, स्वाती मलिवाल यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

07 Dec 2019 17:07:41


safs_1  H x W:

 

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेबाहेरील हत्येचे समर्थन केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. अॅडव्होकेट एम.एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

याचिका दाखल करताना अॅडव्होकेट शर्मांनी सांगितले की, "खासदार जया बच्चन आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वाती मलिवाल यांनी हैदराबादमधील एनकाऊंटरचे समर्थन केले आहे. ही न्यायव्यवस्थाबाह्य हत्या आहे. तिचे समर्थन करणे सर्वार्थाने चुकीचे आहे."

 

इलेक्ट्रॉनिक माध्यमांविरोधात याचिका

 

हैदराबाद एनकाऊंटर संदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमांनादेखील निर्देश देण्यात यावेत अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. अशा खटल्यातील आरोपींवर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही पॅनल चर्चा करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने द्यावेत असे याचिकेत सांगितले आहे. तसेच, ज्या पोलिसांचा या एनकाऊंटरमध्ये सहभाग होता त्यांच्यावर एफआयआर दाखल करणे, त्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्याचीही मागणी यात केली आहे.

Powered By Sangraha 9.0