भारताची विक्रमी कामगिरी ; ८१ सुवर्ण पदकांची कमाई

07 Dec 2019 12:42:35


sf_1  H x W: 0


नवी दिल्ली : नेपाळ येथे सुरु असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ठ राहिली आहे. दक्षिण आशियाई स्पर्धा सुरु होऊन अवघे ६ दिवस झाले आहेत. या ६ दिवसात भारताच्या खात्यामध्ये १६५ पदकांची समावेश असून अव्वल स्थानावर पोहचला आहे. १६५ पादकांमध्ये ८१ सुवर्ण, ५९ रौपय आणि २५ कांस्य पादकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे.

 

द. आशियाई स्पर्धेमध्ये नुकतेच भारतीय खो-खो महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी या दोन्ही संघाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या विजयासाठी रतीय खो-खो महासंघातर्फे (केकेएफआय) अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी या दोन्ही संघाच्या खेळाडूंना प्रत्येकी ५-५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.

 

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने १२ पदकांची कमाई केली असून, यात पुरुष आणि महिला गोळाफेकीतील दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये तेजिंदर पाल सिंगने, तर महिलांमध्ये अभा खाटुआने सुवर्णपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने तीन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. महिलांमध्ये अचिंता शेऊली, राखी हॅल्डर आणि मनप्रीत कौर यांनी जेतेपद पटकावले, तर पुरुषांमध्ये अजय सिंगने रौप्यपदक मिळवले.

 

कोण कितव्या स्थानी ?

 

भारताच्या नावावर १६५ पदके जमा असून पहिल्या स्थनावर आहे. तसेच, दुसऱ्यास्थानी नेपाळच्या खात्यावर ११६ पदके जमा आहेत. तसेच, श्रीलंका १३४ पदकांसह तिसऱ्यास्थानी तर आणि पाकिस्तान ७३ पदकांसह चौथ्या स्थानी आहेत.

Powered By Sangraha 9.0