मराठीत डबिंग होणारच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |

tanhaji_1  H x


सध्या चर्चेत असलेला, अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या धाडसावर हा चित्रपट आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला. आता मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिली.


'१० जानेवारीला तान्हाजी मराठी भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, १० डिसेंबरला मराठी ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच महाराष्ट्रात मराठी भाषेतील तान्हाजी चित्रपट पाहायला मिळणार आहे’, असे ते म्हणाले.


ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अजय देवगनसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोलच्या यामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. येत्या १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@