पितांबरीचं 'आयोकेन' संगणकयुगातील सर्वोत्तम सुरक्षा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019
Total Views |


आजचं युग हे संगणक युग आहे. जीवनाच्या अगदी लहानापासून मोठ्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा प्रत्येक क्षेत्रात संगणकाचं स्थान अनिवार्य झालं आहे. संदेशाची किंवा माहितीची देवाण घेवाण किंवा साठवणूकच नव्हे आर्थिक व्यवहारदेखील संगणकाच्या माध्यमातून होतात.


ad_1  H x W: 0


 

संगणकातील ही माहिती म्हणजेच डेटा ही आजच्या काळातील सर्वात मौल्यवान वस्तू. Data is the new oil ! असं म्हटलं जातं. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वेगवेगळ्या व्हायरसच्या माध्यमातून ही माहिती चोरण्याचे किंवा नष्ट करण्याचेही प्रयत्न होतात आणि त्यामुळेच या सर्वांची सुरक्षा ही देखील तितकीच महत्वाची आहे.

 

ग्राहकांच्या समस्या आणि गरजा ओळखून त्यानुसार अभिनव आणि उच्च गुणवत्तेची उत्पादनं उपलब्ध करणं हे जिचं वैशिष्ट्य आहे अशा पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. या कंपनीच्या डिजिटलकेअर विभागाद्वारे आपल्या संगणकातील माहितीची (Data) आणि संपूर्ण संगणकाची (Laptop /PC ) सुरक्षा करणारं उत्पादन नुकतंच उपलब्ध करण्यात आलं आहे, ते म्हणजे जगभरातील अत्याधुनिक अशा 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (AI) वर आधारित 'आयोकेन' अँटिव्हायरस सॉफ्टवेअर. 'प्रो', 'प्रिमियम' आणि 'झेड प्लस' अशा तीन प्रकारांमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.

 

यात काही खास आणि क्रांतिकारी वैशिष्ट्य आहेत. ती पुढीलप्रमाणे '.आय. बेस्ड प्रोटेक्शन' - यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केलेला असल्याने सहजपणे जाणवणारे पण संभाव्य धोके ओळखून त्यापासून तुमच्या सिस्टिमला वेळीच सुरक्षित केलं जातं. 'डिलिटेड डेटा रिकव्हरी' - यात वापरकर्त्यांकडून चुकीने डिलीट झालेला किंवा व्हायरसमुळे सिस्टिम खराब होऊन डिलिट झालेला डेटा परत मिळवता येऊ शकतो. 'सिक्युअर व्हॉल्ट' - यात वापरकर्ते त्यांच्या महत्वाच्या फाइल्स व्हायरस आणि सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवू शकतात. 'डॅमेज रिकव्हरी' - यात व्हायरस अटॅक झाल्यानंतर तुमची अन्य सॉफ्टवेअर्स पुन्हा सुस्थितीत चालवता येऊ शकतात. 'अल्ट्रा सिक्युर झोन' - बँकिंग किंवा अन्य ऑनलाईन व्यवहारांमध्ये तुमचे पासवर्ड अन्य गोपनीय माहितीची संपूर्ण सुरक्षा यामुळे होते. 'लॅपटॉप प्रोटेक्शन' तुमच्या लॅपटॉपला धोका जाणवल्यास तशी सूचना देणारी यंत्रणा यात आहे.

 
असं हे क्रांतिकारी 'आयोकेन' अँटीव्हायरस सॉफ्टवेअर www. pitambaridigitalcare .com या वेबसाइटवर तसेच 'अमेझॉन' 'फ्लिपकार्ट' वर खास सवलत किमतीत उपलब्ध आहे. अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घेऊन आपले संगणक त्यातील महत्वपूर्ण माहिती सुरक्षित करावी


यासंबंधी
अधिक माहितीकरिता तसेच डिस्ट्रिब्युटर किंवा डिलरशिप करीत ८२९१९ ७१५०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 
आपल्या संगणकातील माहितीची (DATA) आणि संपूर्ण संगणकाची (Laptop /PC ) सुरक्षा करणारं उत्पादन पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. या कंपनीच्या डिजिटलकेअर विभागाद्वारे नुकतंच उपलब्ध करण्यात आलं आहे, ते म्हणजे जगभरातील अत्याधुनिक अशा 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (AI) वर आधारित 'आयोकेन' अँटिव्हायरस सॉफ्टवेअर.
 


Pitambari _2  H
@@AUTHORINFO_V1@@