विंडीजचा कोहलीकडून एनकाऊंटर ; ६ विकेट्सनी मिळवला विजय

06 Dec 2019 22:45:06


saf_1  H x W: 0


हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये हैदराबाद येथे पहिला टी- २० सामना खेळवण्यात आला. भारताने पहिले नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या संघाने २० षटकांमध्ये धावांचा डोंगर उभा करत भारतासमोर ५ विकेट गमावत २०८ धावांचा रतीब घातला. मात्र, विराट कोहलीच्या तुफानी खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. त्याने ५० बॉलमध्ये ९४ धावांची खेळी करत वेस्ट इंडिजचा एनकाऊंटर केला.

 

पहिले फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाने चांगला खेळ केला. लेंडल सिमन्सला २ धावांवर गमावल्यानंतर, लुईस आणि ब्रँडन किंगने संघाचा डाव सांभाळला. लुईसने ४ षटकार आणि ३ चौकारांसह ४० धावा काढल्या. तर ब्रँडन किंगने १ षटकार आणि ३ चौकारांसह ३१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर, शिम्रॉन हेटमायर आणि कर्णधार किरेन पोलार्डने मोर्चा सांभाळला. शिम्रॉन हेटमायरने ५६ तर पोलार्डने ३७ धावा काढल्या. भारताकडून दीपक चहर २ तर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ बळी घेतला आहे.

 

पुढे २०८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने रोहित शर्माच्या रूपामध्ये पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि के.एल.राहुलने धमाकेदार खेळी करत भारताला विजयाच्या जवळ घेऊन गेले. लोकेश राहूलने ६२ धावांकडून आपली विकेट गमावली. त्यानंतर रिषभ पंतने ९ बॉलमध्ये १८ धावांची खेळी केली. मात्र, कर्णधार कोहलीने ५० बॉलमध्ये ९४ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

Powered By Sangraha 9.0