दरवाढी नंतर जिओचे नवीन ऑल इन वन रिचार्ज

05 Dec 2019 13:57:27

jio_1  H x W: 0



मुंबई : एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने नवे दर लागू केल्यानंतर आता रिलायन्स जिओनेही आपले नवीन ऑल इन वन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. रिलायन्स जिओच्या या प्लॅन्समध्ये सुमारे ४०% दरवाढ झाली असली तरी, इतर कंपन्यांच्या तुलनेत हे दर २५%ने कमी आहेत.

डिसेंबर म्हणजेच उद्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. जिओने १९९ ते २१९९ रुपयांदरम्यान विविध प्लॅन सादर केले आहेत. यात २८ दिवसांच्या वैधतेपासून एक वर्षापर्यंत वैधता असलेल्या प्लॅन्सचा समावेश आहे.

नवीन रिचार्ज दर

दर

वैधता

इंटरनेट

कॉलिंग मिनिटं

१९९

२८ दिवस

१.५ जीबी दररोज

१००० मिनिटं

२४९

२८ दिवस

२ जीबी दररोज

१००० मिनिटं

३४९

२८ दिवस

३ जीबी दररोज

१००० मिनिटं

३९९

५६ दिवस

१.५ जीबी दररोज

२००० मिनिटं

४४४

५६ दिवस

२ जीबी दररोज

२००० मिनिटं

५५५

८४ दिवस

१.५ जीबी दररोज

३००० मिनिटं

५९९

८४ दिवस

२ जीबी दररोज

३००० मिनिटं

२१९९

३६५ दिवस

१.५ जीबी दररोज

१२००० मिनिटं


या सर्व रिचार्ज प्लॅन्समध्ये मोफत जिओ सबस्क्रिप्शन दिले जाणार असून अंतर्गत ग्राहकांना मोफत कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0