मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ विशेष व्याख्यानाचे आयोजन

05 Dec 2019 19:51:12


event_1  H x W:


मुंबई : ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (एफआयएनएस) संस्थेच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शनिवारी दि. १४ डिसेंबर रोजी हा व्याख्यान कार्यक्रम सांताक्रूझ पूर्व येथील मुंबई विद्यापीठ परिसरातीलनॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी ग्रीन ऑडिटेरयमसभागृहात शनिवारी दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सथीश रेड्डी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुर सुहास पेडणेकरही उपस्थित राहणार आहेत. दै. ‘मुंबई तरुण-भारत’ आणि ‘महा एमटीबी’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : रवींद्र तिपाठी 9892500618




event_1  H x W:
Powered By Sangraha 9.0