'टीव्ही', 'सेट ऑफ बॉक्स', 'व्हीडीओ गेम्स'सह या वस्तू महागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |

cas_1  H x W: 0



नवी दिल्ली : लवकरच टीव्ही, सेट ऑफ बॉक्स, व्हीडीओ गेम्स आणि काजू आदी वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. केंद्र सरकार या मालावरील आयात शुल्क वाढवणार आहे. देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उत्पदानांना आयात शुल्क लागू करण्याच्या प्रक्रीयेतून वगळ्यात आले होते. त्या वस्तूंनाही या यादीत सामाविष्ठ केले जाणार आहे.

 

वाणिज्य मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये भारताने ४६५ अब्ज डॉलर इतक्या किमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती. २०१८-१९मध्ये त्यात ११ टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा ५१४ अब्ज डॉलर इतका झाला. सरकारने आयातशुल्क सहापटीने वाढवले आहे. त्यामुळे आता देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे मानले जाते.

 

आयातवाढीचा फटका

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या मते काजू, सेट ऑफ बॉक्स, वाहनांचे टायर्स आदी उत्पादनांचे तुलनात्मकरित्या कमी स्वरुपात आयात होते. मात्र, या आयातीवर शुल्क लावल्यास संबंधित उद्योगांना त्याचा फटका बसतो. भारतातील उद्योगांकडे तुलनेने कमी भांडवल असल्याने त्यांच्या विस्तारात अडथळा येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@