अरेच्चा! तुम्ही पाहिलात का रणवीरचा हा नवीन लुक...

04 Dec 2019 11:30:43

ranveer_1  H x


रणवीर सतत त्याच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत असतो. सध्या तो ‘८३’ या चित्रपटात व्यस्त असला तरी त्याने स्वतःचा एक नवीन लुक सोशल मिडियावरून चाह्त्यांसोबत शेअर केला आहे. एका पाठोपाठ एक धडाकेबाज चित्रपट देणारा हा अभिनेता लवकरच एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

रणवीर त्याच्या आगामी चित्रपटात एक गुजराती व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ असं या चित्रपटाच नाव असून तो यात मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटातील आपला लुक रणवीरने त्याच्या ट्विटरवरून शेअर केला. रणवीरचा हा ‘गुजराथी छोकरा’ लुक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.



चित्रपटची कथा आणि इतर व्यक्तिरेखा अद्याप गुलदस्त्यात आहेत. ‘जयेशभाई’ हे एक काल्पनिक पात्र असून, या चित्रपटाची कथा लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर यांची असून मनीष शर्मा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

Powered By Sangraha 9.0