तेलंगणा बलात्कार प्रकरण : विशेष न्यायालयामार्फत चालणार खटला

04 Dec 2019 18:51:55


hydrabad_1  H x



हैद्राबाद
: तेलंगणा पशुवैद्यकीय महिला बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष कोर्टाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी महबूबनगर जिल्हा न्यायालयात विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.आर. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले की," पीडित तरुणीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जाईल.



मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची सूचना केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या घटनेची चौकशी लवकरात लवकर होऊन संबंधित आरोपीना कठोर शिक्षा व्हावी याकरिता फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात येणार आहे.



...तर माझ्या मुलालाही तसंच जाळून मारा

जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर ज्याप्रमाणे त्याने त्या मुलीला जाळून मारलं तसचं त्यालाही मारलं पाहिजे. पीडित तरुणीही एका आईची मुलगी होती ना?,” असे मत हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या आईने व्यक्त केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चिंताकुंता केशावुलूच्या आईने स्वत:चा मुलगा दोषी असल्यास त्याला जाळून टाकण्याची मागणी केली आहे.

Powered By Sangraha 9.0