भाजपच्या श्रीकांचना यन्नम सोलापूरच्या नवीन महापौर

    दिनांक  04-Dec-2019 15:17:09
|

bjp_1  H x W: 0


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत महाविकासआघाडीचा परभव करत भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. श्रीकांचना यन्नम यांना एकूण ५१ मते मिळाली. नवनिर्वाचित महापौर श्रीकांचना यन्नम या विणकर समाजाच्या आठव्या आणि पहिल्याच महिला महापौर ठरल्या आहेत.

याआधी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल असा दावा केला होता. मात्र निकाला नंतर हा दावा फोल ठरला आहे.
सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या उमेदवार शाहजादीबानो शेख यांचा ५१ विरूध्द ८ मतांनी पराभव केला. महापौर निवडीच्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा इत्यादी पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीत शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व बसपाच्या स्वाती आवळे यांनीही भाजपला मतदान केले.