जवानांमध्ये जोरदार भांडण ; ६ जवानांचा मृत्यू

04 Dec 2019 12:41:12


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कडेनार कॅम्पमध्ये आयटीबीपीच्या जवानांमध्ये आपापसांत जोरदार वादावादी झाली. संघर्ष इतका विकोपाला गेला की, या जवानांनी एकमेकांवरच गोळीबार केला. यामध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला. तसेच, काहीजण जखमी झाले आहेत. पोलीस महाअधीक्षक मोहित गर्ग यांनी अशी घटना घडल्याची माहिती दिली. या गोळीबारात २ जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

छत्तीसगडमधील कडेनार हा नक्षलग्रस्त भाग आहे. इथे आयटीबीपीच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी काही गोष्टीवरून भडकलेल्या जवानाने अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. यानंतर तेथे उपस्थित जवानांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच इतर ३ जण गंभीर जखमी होते. त्यानंतर यांच्यामधील एकाच रुग्णालयात मृत्यू झाला.

Powered By Sangraha 9.0