२०२० म्हणजे क्रीडा रसिकांसाठी मांदियाळी

31 Dec 2019 15:45:27


sf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय क्रीडा रसिकांसाठी २०१९ हे वर्ष अतिशय चांगले गेले. अनेक अनेक रोमांचक प्रसंगांमुळे हे वर्ष लक्षात राहिले. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना, भारताची विश्वचषक २०१९मधील उत्तम कामगिरी, मेरी कॉमचे चांगले प्रदर्शन आणि अशा अनेक क्षणांमुळे भारताचे नाव प्रत्येक खेळामध्ये उंचावले. परंतु, भारतीयांसाठी २०१९ पेक्षा २०२० हे वर्ष अगदी खास असणार आहे, यात काही शंका नाही. क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी ही आत्तापर्यंत सर्वोत्तम राहिली आहे. परंतु, येत्या काळात भारतीय क्रिकेट संघासमोर अनेक आव्हाने आहेत. टी-२० विश्वचषक, कसोटी चॅम्पियनशिप आणि भारताचे पहिले स्थान कायम ठेव्याचे एक मोठे आव्हान संघासमोर आहे. विराट कोहलीची भारतीय सेना येत्या काळात काय करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

यंदा आयपीएलकडेही सर्वांच्या नजारा खिळून आहेत. नवीन चेहरे आणि मुंबई, चेन्नई सारख्या प्रत्येक आयपीएल संघाचा एक चाहतावर्ग आहे. त्यामध्ये धुनी, विराट, रोहित शर्मा आणि बुमराहसारख्या जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंसोबतच नव्या दमाच्या नव्या खेळाडूंचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याचसोबत आयसीसीचे अंडर १९ विश्वचषक स्पर्धा आणि महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा याकडेदेखील चाहत्यांचे लक्ष असणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अंडर १९ आणि महिला संघाकडेदेखील चाहत्यांचे आकर्षण वाढले आहे. दर चार वर्ष्यांमध्ये एकदा येणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही यावर्षी जपानची राजधानी टोकियो येथे होणार आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंकडे खास लक्ष असणार आहे. कारण, गेली काही वर्ष भारतीय खेळाडूंची कामगिरी ही चांगली राहिली आहे. याशिवाय विम्बल्डन टेनिस स्पर्धा आणि रणजी सामन्यांचेदेखील आकर्षण क्रीडा प्रेमींना आहे.

Powered By Sangraha 9.0