सुनील राऊतांना काहीतरी जबाबदारी देऊ : आदित्य ठाकरे

    दिनांक  30-Dec-2019 17:26:29
Sunil Raut _1  
 


मुंबई : संजय राऊत यांचे नाराज बंधू सुनील राऊत यांना काहीतरी जबाबदारी देऊ, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारामुळे सर्वाधिक नाराजी शिवसेनेत दिसून आली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान अपेक्षित होते. मात्र, ते न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडे काहीतरी जबाबदारी देऊ, अशा शब्दांत प्रतिक्रीया दिल्याने शिवसेनेतील नाराजीचा सुर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

 

संजय राऊत यांनी गेले काही दिवस शिवसेनेची भूमीका ज्याप्रमाणे लावून धरत महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवला. त्याच्या मोबदल्यात त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद अपेक्षित होते. मात्र, त्यांना स्थान न मिळाल्याने सुनील राऊत आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे सांगण्यात येत आहे. पक्षातील ही नाराजी थोपवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी राऊत यांना काहीतरी जबाबदारी निश्चित देऊ, असे सांगत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिल्याने सुनील राऊत आणखी दुखावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.