संजय राऊत नाराज, मंत्रीपदाच्या शर्यतीतून सुनील राऊतांचा पत्ता कट

    दिनांक  30-Dec-2019 11:02:09
|
Sanjay Raut _1  


'हे' असतील नवे मंत्री ! वाचा सविस्तर

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताचा दिवस ठरला. तीन पक्ष एकत्र येत सरकार स्थापन होत असल्याने नाराजी आणि कुरबूर सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे. मात्र, हा तीन पक्षांचा संसार एका घडीत बसवणारे संजय राऊतच नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना कोणतेही मंत्रीपद मिळणार नसल्याने ही राऊत नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याची कल्पना प्रामुख्याने मांडली होती. त्यानंतर सातत्याने माध्यमांसमोर शिवसेनेची भूमीका मांडून जे आपण बोललो ते करून दाखवणारच असा ठाम विश्वासही व्यक्त केला होता. त्याचे अपेक्षित फळ म्हणून सुनील राऊत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता तूर्त दिसत नाही. शिवसेनेला सर्वात १३ मंत्रीपदांचा वाटा सत्तेत देण्यात आला होता. तर राष्ट्रवादीला १३ आणि काँग्रेसला १० मंत्रीपदे मिळणार आहेत.वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.