याकूबच्या फाशीला विरोध करणारा आमदार उद्धव सरकारच्या मंत्रिमंडळात

30 Dec 2019 23:07:35

ut_1  H x W: 0



मुंबई : मार्च १९९३ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार याकूब मेमनच्या फाशीला पत्र लिहून विरोध दर्शविणारा आमदार अस्लम शेख याने आज उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली
. हा कॉंग्रेसचा आमदार आहे, हे विशेष!


२८ जुलै २०१५ रोजी याच अस्लम शेख यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना पत्र लिहून याकूब मेमनला फाशी दिली जाऊ नये
, अशी विनंती केली होती. याकूबला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मेमननेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता. या अर्जाचे समर्थन करणारे पत्र अस्लम शेख यांनी राष्ट्रपतींना लिहिले होते, ही बाब आता समोर आली आहे.


१९९९ ते २००४ या कालावाधीत अस्लम शेख समाजवादी पक्षात होते
. यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. २०१४ मध्ये त्यांनी राम बोराट यांचा पराभव केला. २०१९ मध्ये रमेशसिंह ठाकूर यांचा त्यांनी पराभव केला.

Powered By Sangraha 9.0