मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर भाजपचा बहिष्कार

30 Dec 2019 11:26:39


asf_1  H x W: 0


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज, सोमवारी होणार आहे. विधानसभेच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात निर्वाचित आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, विधासभेतील विरोधी पक्ष भाजपकडून या शपथविधीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.

 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी तसे न करता २ लाखांपर्यंतच कर्ज माफ करण्यात आले. 'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतकरी अडचणीत असताना मात्र शपथ सोहळा थाटामाटात होत आहे.' असा आरोप करत भाजपने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0