हे नवे स्टारकिड्स पदार्पणास सज्ज !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |

akshay_1  H x W


जान्हवी कपूर, सारा आली खान, करण देओलनंतर आता अजून दोन स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहे. अभिनेता अक्षय खन्ना याची मुख्यभूमिका असलेल्या ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियंक शर्मा आणि अभिनेता रवी किशन यांची मुलगी रेवा किशन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.


नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कथा बिहारच्या ‘
पकड़ौआ विवाह’ पद्धतीवर आधारित आहे. या प्रथेनुसार मुलाचे अपहरण करून त्याचे लग्न लावून दिले जाते. या विनोदी चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना कुटुंबासोबत घेता येणार आहे.

‘सब कुशल मंगल’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षी, ३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. करण कश्यप यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, प्राची मोहन यांची निर्मिती आहे.

@@AUTHORINFO_V1@@