पुण्यात आढळला तरुणीचा मृतदेह

    दिनांक  03-Dec-2019 13:44:57
|

pune_1  H x W:


पुणे : देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच पुण्यात सिंहगरोड परिसरात माणिकबाग येथे राहत्या घरात एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. तेजसा पायाळ असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, ही घटना सोमवार दुपारी २ ते ३ च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी नोकरीच्या शोधासाठी पुण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन आई आणि दोन बहिणी समवेत राहत होती. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब बीड इथे गेले होते. मात्रतीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली असून शवविच्छेदनानंतर याबाबत गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तरुणीचा मृत देहावर गळा दाबल्याच्या खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळल्यामुळे तरुणीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर घरातले सामान अस्ताव्यस्त पडल्यामुळे चोरीचा संशयदेखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.