खुशखबर ! अखेर विक्रम लॅण्डरचा लागला शोध

03 Dec 2019 10:13:34


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा(इस्रो) महत्त्वकांक्षी चंद्रयान २ ही मोहिम विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने अडचणीत आली होती. या मोहिमेबाबत नासाने एक नवीन खुलासा केला आहे. नासाला विक्रम लँडरची काही छायाचित्रे मिळाली आहेत. ट्विट करून ही माहिती दिली. नासाच्या 'लुनार रिकॉनिसेंस ऑर्बिटर'ने ही छायाचित्रे घेतली आहेत. यामध्ये विक्रम लँडरचे ज्या जागी हार्ड लँडिंग झाले त्या ठिकाणची ही छायाचित्रे आहेत.

 
 
 

लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाच्या ईशान्येला सुमारे ७५० मीटर अंतरावर काही अवशेष आढळले आहेत. नासाने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामध्ये हिरवे ठिपके लँडरचे तुकडे दर्शवत असून निळे ठिपके हार्ड लँडिंगमुळे जमिनीला पडलेले खड्डे दर्शवत आहे. लँडरचे मोडतोड झालेले अवशेष दिसत आहेत. ७ सप्टेंबरला विक्रम लँडरचा लँडिंगच्या काही मिनीटे अगोदर पृथ्वीशी संपर्क तुटला होता. याआधीही विक्रम लँडरबाबत नासाने मोठा खुलासा केला होता. चांद्रयान-२ च्या विकम लँडर जेथे उतरले ती जागा शोधण्याचे काम अजून बाकी आहे, असे नासाने सांगितले होते.

Powered By Sangraha 9.0