पुढच्या वर्षीपासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’

03 Dec 2019 19:16:52

ration card_1  



नवी दिल्ली - पुढच्या वर्षीजूनपासून एक देश, एक रेशन कार्ड’ही योजना देशभरात लागू होईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या १४ राज्यांमध्ये रेशन कार्डसाठी पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली असून ती सुविधा लवकरच देशातील सर्व राज्यात सुरु केली जाईल. ज्या वॉर्ड किंवा पंचायतमध्ये रेशन कार्ड होते, त्याच परिसरातीतल सरकारी रेशनच्या दुकानात आतापर्यंत रेशन मिळत होते.

सामान्य नागरिकांना या योजनेमुळे भरपूर फायदा होणार आहे. यानंतर आता पीडीएस दुकानाशी लोक बांधिल राहणार नाहीत आणि त्यांना कधीही रेशन मिळू शकेल. त्यांना रेशन दुकानावर अवलंबुन राहण्याची गरज नसेल आणि भ्रष्टाचारच्या प्रमाणातही कमी येईल. पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कामानिमित्त इतर राज्यात राहतात, त्या लोकांना या योजनेचा फायदा होईल. त्यांना कोणत्याही राज्यातील रेशन दुकानावरुन आता रेशन मिळू शकेल.

इंटीग्रेटिड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस(आयएमपीडीएस) अंतर्गत लाभार्थी कोणत्याही जिल्ह्यातून रेशन खरेदी करू शकतील. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा या राज्यांचा यात समावेश आहे.

Powered By Sangraha 9.0