जम्मू काश्मीर : दुकानाच्या जाळपोळीप्रकरणी चौघे अटकेत

03 Dec 2019 17:22:29


jammu_1  H x W:



श्रीनगर
: जम्मू काश्मीरमध्ये आज बारामुल्ला परिसरात जाळपोळ व असंतोष पसरविल्या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली. एसएसपी अब्दुल कय्यूम यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की,"आरोपींची ओळख पटली आहे. मारूफ, आदिल, बिलाल और समीर अशी त्यांची नावे आहेत. यांच्या प्रमुखाने आपला व्यापार वाढविणे या उद्देशाने इतर दुकानांना आग लावली." २४ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने पेटवून देण्यात आली होती.


या अगोदर सप्टेंबर महिन्यात बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये पोलिसांनी काही संशयीत दहशतवाद्यांना अटक केली होती. ते बारामुल्लातील दुकानदारांना बाजारपेठ बंद करण्यासाठी धमकावत होते. तसेच परिसरात धमकी देणारे पोस्टर लावण्यासारख्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग होता.

Powered By Sangraha 9.0