पुन्हा एकदा आयपीएलचे वारे ! लिलावासाठी ९७१ खेळाडूंची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : भारतामध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वारे वाहू लागले आहे. अनेक संघामध्ये फेरबदल केल्यानंतर आता नवीन खेळाडूंच्या लिलावासाठी खेळाडूंची यादी तयार झाली आहे. आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या लिलावासाठी तब्बल ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. आयपीएलच्या १२ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी एक निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.

 
 

लिलावामध्ये एकूण ७३ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले २१५ खेळाडू भाग घेतील, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या ७५४ खेळाडूंनीही प्रथमच नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या १९६ विदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर असे ६० परदेशी खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप खेळलेले नाहीत. या लिलावासाठी ऑस्ट्रेलियाचे ५५, दक्षिण आफ्रिकेचे ५४, श्रीलंकाचे ३९, न्यूझीलंडचे २४, इंग्लंडचे २२, वेस्ट इंडीजचे ३४, अफगाणिस्तानचे १९, बांग्लादेशचे ६, झिम्बाब्वेचे ३, नेदरलँड्स व अमेरिकेचा प्रत्येकी एक इत्यादी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@