पत्रकारितेतून उद्योजकतेचे ‘सीमां’तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


seema singh_1  पत्रकारिता करत असतानाच ‘रुट्स टेल’ या कंपनीच्या माध्यमातून हातमाग आणि हस्तकलेचे उत्तम नमुने सादर करीत जगभरात भारतीय कलाकृतींचा प्रसार करणार्‍या सीमा सिंग यांच्याविषयी...
“मी मुळची शेतकर्‍यांच्या घरातली
. त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही शिकलो की, स्वप्ने पाहिली जात नाहीत, तर ती पेरली जातात. माझ्या रक्तात मजुरी लिहिली गेली आणि मी सुरुवातीपासूनच त्यासाठी कार्यरत आहे.” सीमा सांगत होत्या. आज सीमा सिंग आपल्या कलाविष्कारामुळे जगभरात ओळखल्या जातात. पत्रकारिता करत असतानाच त्यांनी आपली आवड ओळखून त्याचे व्यवसायात रुपांतर केले. त्यामुळे सीमा सिंह आज अनेक महिला उद्योजिकांचे प्रेरणास्थान ठरल्या आहेतसीमा सिंग यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सीमा यांचे वडील दिल्ली विद्यापीठात नोकरी करायचे. दिल्लीतच सीमा यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयातून एम.ए केले. त्यांच्या बालपणीविषयीच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, “माझी संस्कृती जाणून व समजून घेण्यासाठी मी माझ्या मूळगावी समस्तीपूर येथे असे. कदाचित याच कारणामुळे माझ्यात या स्वदेशी कला जाणून घेण्याचे व त्यांच्या निर्मितीबाबतचे कुतूहल निर्माण झाले व ती जाण माझ्यात आपसुकच आली, जी आज ‘रूट्स टेल’च्या माध्यमातून जगासमोर सादर आहे.
mansa_1  H x W:


सीमा महाविद्यालयामध्ये असतानाच ऑल इंडिया रेडिओ’मध्ये कार्यरत होत्या. ‘एफएम गोल्ड’ या रेडिओ चॅनलमध्ये त्या ‘प्रोग्राम प्रेझेंटर’ होत्या. त्यानंतरच्या काळात त्या ‘वृत्तनिवेदिका’ म्हणूनही त्यांनी काम केले. रेडिओनंतर त्यांनी ‘जैन टीव्ही’मध्ये ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून नोकरी केली. सीमाने या चॅनेलमध्ये केवळ तीन महिनेच काम केले. या तीन महिन्यांतच त्यांना ‘प्रोडक्शन’ची संपूर्ण कामे समजली. सीमा यांनी पत्रकारितेचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा त्यांच्याकडे ‘संज्ञापन’ विषयातील पदवीही नाही. जे काही काम करायला मिळाले, त्यातून त्या सतत शिकत राहिल्या. सीमा म्हणतात की, “आपण संस्थेत शिकतो आणि एखाद्या क्षेत्रात काम करतो. याचे ७०:३० असे गुणोत्तर असते. त्यांच्या मते, आपण काम करून जे शिकतो ते ७० टक्के आहे आणि जे संस्था शिकवते, ते फक्त ३० टक्के आहे. त्या व्यावहारिक ज्ञानाचा आपल्यावर असणार्‍या परिणामाचा अधिक विचार करतात.

 


mansa_1  H x W:

१९९९ मध्ये मंदीच्या काळात जेव्हा त्यांना
जैन टीव्ही’मधून नोकरी सोडावी लागली, त्यानंतर सीमा यांनी ‘बीएजी फिल्म्स अ‍ॅण्ड मीडिया लि,’मध्ये ‘बातमीदार’ म्हणून काम केले. काही काळानंतर, ‘सहारा समय’साठी पत्रकारिताही केली. ‘सहारा इंडिया’ परिवारामध्येच त्यांनी ‘निर्माती’ व ‘निवेदिका’ म्हणून काम केले. त्यानंतर, सीमा यांनी काही स्वयंसेवी संस्था, विकसनशील केंद्रे, महिला आणि मुलांसाठी माहितीपट तयार केले. लग्नानंतर सीमा काही काळ आपल्या पतीसमवेत अमेरिकेतदेखील वास्तव्यास होत्या.

 आपल्याला कपड्यांची जाण आणि कलेचीही आवड असल्याचे सीमा सांगतात
. त्यांची पत्रकारिता मूलत: कला आणि संस्कृती विषयांशी संबंधित होती. कपड्यांविषयीचे उत्तम ज्ञान आणि कलेबद्दलचे प्रेम जगासमोर सादर करण्यासाठी, हातमाग आणि हस्तकलेचा एकत्रित संगम साधत ‘रूट्स ऑफ टेल’ची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीच्या काळात कारागिरांकडून कलाकृती बनवून घेण्यास सुरुवात केली. साडी, दुपट्टा आणि टी-शर्टवर ही कलाकुसर केली. त्यांच्या या कल्पक हस्तकला आणि चित्रांमुळे आपसुक ग्राहकही त्यांच्या उत्पादनाकडे आकर्षित झाले. अशा प्रकारे सीमा यांनी ‘मधुबनी’ आणि ‘मिथिला’ या दोन कलांचा एकत्रित संगम साधत आपल्या व्यवसायाची पायाभरणी केली. केवळ पाच साड्या आणि पाच कारागिरांसह सुरु केलेल्या ‘रुट्स टेल’मध्ये आज ६० कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा सुरुवातीच्या काळातील एकूण नफा पाच लाख रुपये होता, जो आज २८ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या दुकानात साडी, दुपट्टा, हस्तशिल्प, जॅकेट्स, स्टॉल्स, सूट, कुर्ता, ज्वेलरी, गृहसजावटीची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. तसेच, पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी कपडे आणि इतर हस्तकला व हस्तशिल्पांचीही रेलचेल असते.


mansa_1  H x W:

सीमा म्हणतात की
, “देशभरातील सर्व कलाकृतींसह कुशल कलाकारांसोबत काम करण्याचा त्यांचा मानस आहे.” मधुबनी कलेसह कपडे आणि पेंटिंग्ज करणे हे त्यांचे मुख्य कार्य. भारतीय कलाकृतीचा जगभर विस्तार करणे हे यामागचे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट. पादत्राण्यांवर त्यांनी बनवलेल्या मधुबनी पेंटिंगलाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा जेव्हा त्या ‘दिल्ली हाट’ येथे प्रदर्शन आयोजित करतात, तेव्हा लोक कागदाचे कटिंग्ज आणतात आणि तत्सम पेंटिंगच्या पादत्राण्यांची व साड्यांची मागणी करतात.” ‘रुट्स टेल’साठी सीमा यांना निर्यातीचा परवानादेखील मिळाला आहे. ‘रूट्स टेल’ची उत्पादने अमेरिका, लंडन आणि दुबईमध्येदेखील निर्यात केली जातात. तिथल्या लोकांना भारतीय कलाकृतींमध्ये व भारतीय शैलीचे पेहराव व पेंटिंग्ज आवडतात. अशा या आत्मविश्वासू महिला पत्रकार व उद्योजिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

@@AUTHORINFO_V1@@