बिग बी ५०व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

    29-Dec-2019
Total Views |


amitabh_1  H x



नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना ५०व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. या खास क्षणी त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन देखील उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारत या विशेष प्रसंगी ते म्हणाले "मला पात्र ठरविले यासाठी मी भारत सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सदस्यांचे आणि ज्युरी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू इच्छित आहे.ही सर्व देवाची कृपा आणि आई-वडिलांचा हा आशीर्वाद आहे. भारतातील लोकांचे माझ्याविषयीचे प्रेम आहे हे ,म्हणूनच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. जेव्हा मला हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न उद्भवला की, हे आपल्यासाठी संकेत आहेत की बास आता माझे कार्य पूर्ण झाले आहे की नाही आता मला अधिक काम करावे लागेल."


२३डिसेंबर रोजी ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले तेव्हा अमिताभ बच्चन उपस्थित राहू शकले नाहीत. आजारी असल्याने अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी प्रवास करु नये अशी सूचना केली होती. स्वत: अमिताभ बच्चन यांनी २२डिसेंबरच्या संध्याकाळी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती.



amitabh_1  H x


अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये 'मेगा स्टार' आणि 'बिग बी' म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे १९६९मध्ये प्रदर्शित झालेला सात हिंदुस्तानीहा त्यांचा पहिला चित्रपट होता. १९७३मध्ये, प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले व यानंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही. जवळपास दोन दशके ते हिंदी चित्रपटातील सर्वात यशस्वी नायक राहिले. एक काळ असा आला की जेव्हा अमिताभ यांची फिल्मी कारकीर्द एका विशेष टप्यावर येऊ लागली होती.

 


यानंतर
, अमिताभ यांनी नव्याने काम करण्यास सुरुवात केली आणि नवीन दिग्दर्शकांसह नवीन प्रयोग केले. 'ब्लॅक' आणि 'पा' यासारखे प्रायोगिक चित्रपट त्यांनी केले. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून त्यांनी टेलिव्हिजनच्या जगात प्रवेश केला आणि येथेही इतिहास घडविला. अमिताभ ५० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहेत यादरम्यान त्यांना चार वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, १५ फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१५मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.