ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

    दिनांक  28-Dec-2019 09:50:41
|


saf_1  H x W: 0


मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे मुंबईत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ६९ वर्षीय सबनीस हे गेली सुमारे ५० वर्षे व्यंगचित्रांद्वारे राजकीय-सामाजिक वास्तवावर टिप्पणी करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

 

मराठी राजकीय व्यंगचित्रकारांच्या यादीत विकास सबनीस यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांचा पगडा होता. त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात मुंबई सकाळ, संडे आँबझरवर,मार्मिक,सामना, तरुण भारत आणि आपले महानगरमधून त्यांनी व्यंगचित्रे काढली. ते कोणत्याही विषयावरचे व्यंगचित्र सहजपणे काढत असत. संपूर्णपणे व्यंगचित्र कलेवर उपजीविका असलेला कलाकार होता.कोणावर अवलंबून रहाणे त्यांना पसंत नव्हते.

 

विकास सबनीस यांचा व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मागील वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली आणि शनिवारी त्यांचे शिवाजापार्क येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे आहे.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.