दिल्ली गोठली तर महाराष्ट्रातही गुलाबी वारे

28 Dec 2019 10:21:54


asf_1  H x W: 0


मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये सकाळी ६.१० वाजता तापमानाचा पारा २.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. या हिवाळ्यात दिल्लीच्या थंडीने १०० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. शनिवारी सकाळी दिल्लीतील किमान तापमान २.४ डिग्रीपर्यंत खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच, दिल्लीसह उत्तर भारतही थंडीने पुरता गारठला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पारा शून्याच्याही खाली उतरला आहे. श्रीनगरमध्ये सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. तर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे दल लेकही अक्षरशः गोठून गेले आहे.

 

महाराष्ट्रातही २ दिवस गुलाबी थंडीचे वारे

 

सध्या देशभरात थंडीची लाट असतानाच महाराष्ट्रातही पारा चांगलाच उतरला आहे. यावर्षी हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी १५ ते २० अंशांवर असणारे येथील तापमान आता थेट ६.० अंश सेल्शिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे गरम, लोकरी कपड्यांशिवाय येथील नागरिकांना घराबाहेरही पडणेही अशक्य झाले आहे.

Powered By Sangraha 9.0