उद्धव साहेब, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमची फसवणूक करतायत : चंद्रकांतदादा पाटील

    दिनांक  28-Dec-2019 13:04:46
|


asf_1  H x W: 0

 


पुणे : "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसवत आहेत. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे." असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे शहरात आयोजीत केलेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

"आताच्या सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. आमच्या सरकारने २००१ ते २०१६ पर्यंत १.५ लाखांची कर्जमाफी केली. त्यामुळे या सरकारमध्ये फक्त २०१६ ते चालु पर्यंतचीच कर्जमाफी होणार आहे. त्यातही शासनाने बनवलेल्या निकषात पिक कर्जमाफी, असा उल्लेख आहे. त्यामुळे याचा खरे तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, तर भलत्यांनाच फायदा होणार आहे. खासकरून काँग्रस राष्ट्रवादीच्या लोकांनाचा याचा फायदा होणार आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

 

"काँग्रेस नेत्यांच्या दोन साखर कारखान्यावर २०० कोटींची कर्ज आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयामुळे त्यांचेच कर्जमाफ होणार आहे." असा आरोपही त्यांनी केला. "उध्दव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली, ती चुकीची आहे. याचा फायदा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील लोकांनाच होणार आहे. या दोन्ही पक्षातील लोक उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत आहेत." असा टोला पाटील यांनी लगावला.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.