छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

27 Dec 2019 11:53:37

kushal_1  H x W


मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेला कुशाल पंजाबीचे निधन झाले आहे. कुशाल केवळ ३७ वर्षांचा होता. त्याचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने त्याने आत्महत्या केली असावी असे कळते आहे. त्याच्या मृत्यू मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुशालवर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कुशालच्या निधनाची वार्ता त्याचा जवळचा मित्र करणवीर बोहराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली.




'तुझ्या जाण्याच्या या बातमीने मी हैराण आहे, मी अजूनही ही गोष्ट स्वीकार करू शकत नाहीये, मला माहित आहे तू एका उत्तम जागी आहेस. तू मला नेहमी आयुष्याप्रती प्रेरित केले आहे. मला नेहमी तू डान्सिंग डॅडीच्या रूपातच आठवशील.' अशा भावूक शब्दांत करणवीर बोहराने आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाची बातमी दिली.


कुशालने एक डान्सर आणि मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९५ मध्ये आलेल्या 'अ माउथ फुल ऑफ स्काय' मधून तो पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकला होता. त्यानंतर'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देखो मगर प्यार से', 'डॉन', ‘झलक दिखला जा’ यांसह अनेक मालिकांमध्ये दिसला. त्याने 'लक्ष्य', 'सलाम ए इश्क', 'हमको इश्क ने मारा' सारख्या बॉलीवूड चित्रपटातही काम केले होते. सध्या तो ‘तेरे इश्क मी मरजांवा’ या मालिकेत काम काम करत होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. त्याच्या जाण्याने संपूर्ण मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0