कर्जमाफीबाबत सरकारने फसवले; निलेश राणे यांची टीका

27 Dec 2019 17:04:43


asf_1  H x W: 0


रत्नागिरी : "उद्धव ठाकरे सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले. कर्जमाफीबाबत सरकारने शेतकर्‍यांना फसवले आहे. शेतकर्‍यांना जे आश्‍वासन दिले त्यातील काहीही या सरकारने केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत." अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. याआधीदेखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावरून निलेश राणे यांनी टीका केली आहे.

 

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ऍड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. मंत्रीमंडळ विस्तार, मंत्रीपद, कर्जमाफी याबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंसह अनेक भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावरून निशाणा साधला होता.

Powered By Sangraha 9.0