भगव्यावर आक्षेप घेणाऱ्या सरदेसाईंचा 'समाचार'

27 Dec 2019 17:34:42

Rajdeep Sardesai _1 

 


मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात दिसणाऱ्या भगव्या झेंड्यांबद्दल आक्षेप घेणाऱ्या राजदीप सरदेसाई यांना त्यांच्याच भाषेत नेटकऱ्यांनी उत्तर दिले आहे. सरदेसाई म्हणतात, "जिथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे, तिथे केवळ तिरंगा आणि महात्मा गांधी यांचा फोटो दिसत आहे. मात्र, ज्या ठिकाणी नागरिकत्व कायद्याला पाठींबा दिला जात आहे, तिथे तिरंग्यासह भगवा झेंडाही दिसत आहे." या मागचा मुळ उद्देश समजून घ्यावा, असा त्यांच्या ट्विटचा रोख होता. मात्र, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील आंदोलनाला धार्मिक किनार देणाऱ्या सरदेसाई यांचा नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतला.

 

देशभरात या आंदोलनांमध्ये झालेल्या हिंसाचाराचा जाब राजदीप यांना विचारण्यात आला. पोलीसांना मारहाण करणारे महात्मा गांधीजींचा विचार मानणारे कसे, असा जाब त्यांना विचारण्यात आला. हिंदूत्वाला विरोध करणारे सीएएच्या विरोधात कसे, पोलीसांना निर्दयीपणे मारणारे संविधानाचे रक्षक कसे, असा जाब विचारत त्यांना जाब विचारण्यात आला. भगवा रंग हा तिरंग्यातही आहे, गांधींचे नाव घेऊन तुम्ही हिंसेचे समर्थन करत आहात का?, अशा शब्दात त्यांचा समाचार घेण्यात आला.

 

लोक सर्व जाणतात, त्यामुळे निष्पक्ष पत्रकारीतेचे बिरूद मिरवणे बंद करा, प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. सरकारला जाब विचारण्याचे व्यक्तीस्वातंत्र्यही आहे, ते संविधानानेच दिले आहे. मात्र, तुम्ही या आंदोलनांना धर्माची किनार देऊ नका, असा टोलाही त्यांना लगावला आहे.

 

Powered By Sangraha 9.0