‘आय सपोर्ट ए टू झेड...’

27 Dec 2019 19:22:58


caa_1  H x W: 0



अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक ‘सीएए’ला समर्थन देत आहेत. त्यांच्या हातातल्या पोस्टरवर ‘याला जाळा, त्याला मारा’ असा हिंसक संदेश नाही किंवा अश्लील संदेशही नाही. त्यांच्या मोर्चामध्ये, त्यांच्या पोस्टरवर आणि मुळात त्यांच्या मनात आणि विचारात, भारत अखंड राहावा, सुरक्षित राहावा आणि प्रगती करावा, हाच हेतू आहे.


मुळ भारतीय वंशाच्या अमेरिकन बांधवांनी संपूर्ण अमेरिकेमध्ये भारत सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नुकतेच मोर्चे काढले
. अमेरिकेच्या डब्लिनमध्ये विनीत गोयल यांनी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ समर्थनार्थ मोर्चा काढला होता. ते म्हणाले की, “सीएएच्या माध्यमातून मुसलमानांना देशाबाहेर काढणार, अशा खोट्या अफवा कम्युनिस्ट तसेच कट्टर धर्मांध मुस्लीम संघटना पसरवत आहेत. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’बद्दलचे हे खोटे भय दूर व्हावे म्हणून या रॅलीचे आयोजन केले आहे,” तर सिएटलमध्ये अशा रॅलीचे आयोजन करणार्‍या अर्चना सुनील म्हणाल्या की,“बहुसंख्य लोकांना माहितीही नाही की, ‘सीएए’, ‘एनआरसी’ काय आहे? तरीही ते विरोध करतात. बरं ते एकून सुद्धा घेत नाहीत. ते फक्त खोटं पसरवतात.”



हे विस्ताराने सांगण्याचे कारण इतकेच की
, काही दिवसांपूर्वी भारतीय संसदेमध्ये ‘सीएए’बद्दल निर्णय होत होता, त्यावेळी अमेरिकेचे म्हणणे होते की, या कायद्याला अमेरिका विरोध करणार. पण, भारताने या कायद्याचे मूळ स्वरूप जगासमोर मांडले की, आपल्या देशात कोणते नागरिक राहणार, कोण नाहीत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे. तो जसा अमेरिकेला आहे, तसा भारतालाही आहे. तसेच या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. ते विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून अनन्वित अत्याचार झाले, अशा हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, शीख, ख्रिश्चन यांच्यासाठी आहे. जे पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश येथून अक्षरशः जीव वाचवून पळून आलेत, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे.



भारतीय सरकारच्या या सत्य खुलाशानंतर सगळ्या जगाची शांती झाली
. मात्र, शांती झाली नाही, खात्री पटली नाही ती कम्युनिस्ट, काही विद्रोही आणि कट्टर मुस्लीम धर्मांध राजकीय पक्ष आणि संस्थांची. ते भारतीय मुस्लिमांना भडकवत सुटले की, ‘सीएए’ तुमचे नागरिकत्व हिसकावणार. त्यांचे ऐकून देशात जाळपोळ करायला मग उतरले हे रस्त्यावर. (देशावर प्रेम करणारे आणि स्वतःचे विचार असणारे, त्यामुळे देशात ‘सीएए’वरून दंगा न करणारे काही सन्माननीय अपवादही आहेत). मुळात ‘खतरेमें है’ हा शब्द ऐकून जगाला ‘खतरेमें’ करणार्‍यांच्या पुढे कितीही सत्य मांडले तरी ते ऐकणार नाहीतच. अर्थात, सगळेच दहशतवादी नाहीत. पण, ‘सीएए’विरोधात रस्त्यावर उतरणार्‍यांना माहितीसुद्धा नाही की ‘सीएए’ काय आहे? फक्त संशय आणि अफवा.



काही बिचारे तर महागाईच्या विरोधात आले
, तर काही केवळ हिंदुत्ववादी भाजप सरकार सत्तेत आहेत म्हणून रस्त्यावर उतरले. पण, ‘सीएए’ने आपले काही नुकसान होणार नाही, हे समजले की, मग यांचा प्रश्न सुरू होतो की, ‘सीएए’मध्ये मुसलमानांना नागरिकत्व का नाही? यांना समजावले की पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या मुस्लीम देशांमध्ये मुस्लिमावर मुस्लीम आहे म्हणून अत्याचार होतील का? हे पटले तर मग यांचा पुढचा प्रश्न, ‘भारत सरकार आमच्याकडे कागदपत्र मागेल आणि आम्हाला देशाबाहेर काढेल,’ असे होणार नाही, असे कितीही खात्रीपूर्वक सांगितले तरी तर्कावर तर्क लढवत भारतात ‘मुस्लीम खतरेमेंच आहे,’ असा सारांश काढायला हा जमाव तयार. बरं, ‘खतरेेमें है’ तरी यांना भारतातच राहायचे आहे आणि रोहिंग्यांनाही आणायचे आहे. हा एक अजब तर्क. असो, तर या ‘खतरेमें है’ असलेल्यांचा असा सार्वत्रिक अनुभव सगळ्या जगाला.



आजही मुंबईच्या काही गल्ल्यांमध्ये पल्स पोलिओ डोस देणार्‍यांना हाकलवले जाते
, कारण काय, तर म्हणे आमच्या कौमला अपंग बनविण्यासाठी पल्स पोलिओ बनवले आहे. ही अशी मानसिकता असल्यावर ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’बद्दल ते काय विचार करत असतील? याचा अपवाद वगळून विचार केला असता मेंदूचा भुगाच होतो. अर्थात हे सगळे अमेरिकेतील भारतीय बांधवांनीही अनुभवले असेलच. त्यामुळेच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक ‘सीएए’ला समर्थन देत आहेत. त्यांच्या हातातल्या पोस्टरवर ‘याला जाळा, त्याला मारा’ असा हिंसक संदेश नाही किंवा अश्लील संदेशही नाही. त्यांच्या मोर्चामध्ये, त्यांच्या पोस्टरवर आणि मुळात त्यांच्या मनात आणि विचारात, भारत अखंड राहावा, सुरक्षित राहावा आणि प्रगती करावा, हाच हेतू आहे. या अमेरिकन मोर्चेकर्‍यांच्या पोस्टरवर लिहिले आहे, ‘आय सपोर्ट सीएए, आय सपोर्ट एनआरसी, आय सपोर्ट ए टू झेड, एव्हरी पॉलिसी ऑफ अवर इंडियन गव्हर्नमेंट.’

Powered By Sangraha 9.0