... तर मातोश्रीबाहेर कॅमेरे लागतील : चंद्रकांतदादा पाटील

    दिनांक  27-Dec-2019 13:06:50
|


saf_1  H x W: 0


मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच, जर राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

 

"अर्थखाते, महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहमंत्रिपदही दिले तर तुमच्याकडे काय केवळ मुख्यमंत्रिपद ठेवणार का?" असा खोचक सवालही चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. शिवसेनेकडे असलेले राज्याचे गृहमंत्रिपद राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या बातमीनंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.