पुणेकरांना सूर्यग्रहण दिसलेच नाही!

    दिनांक  26-Dec-2019 12:10:06
|


pune_1  H x W:पुणे : दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याची पुणेकरांची संधी गुरुवारच्या ढगाळ वातावरणाने हिरावून घेतली. शहरात पहाटेपासून पाऊस सुरु असून परिणामी सूर्याचे दर्शन झालेच नाही.


विविध संस्थांनी दुर्बिणीद्वारे गुरुवारी सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पुणेकरांना हा क्षण अनुभवता आला नाही. सकाळी ८ ते १० या वेळेत सूर्यग्रहण दिसणार होते. यापूर्वी जानेवारी २०१० रोजी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. गुरुवारी दिसणारे हे सूर्यग्रहण पुण्यातून खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार होते.


सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी ग्रहण सुरु झाले. पुण्यातून बघताना सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी सूर्य जास्तीत जास्त ७८ टक्के झाकला जाणार होता. सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी हे ग्रहण संपले.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.