धक्कादायक ! सीएमईमध्ये सराव करताना २ जवानांचा मृत्यू

    दिनांक  26-Dec-2019 17:37:01


asf_1  H x W: 0

 

पुणे : पुण्यातील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे जवान दररोज सरावाचा एक भाग म्हणून प्रात्यक्षीक करत होते. त्या दरम्यान अपघात होऊन या जवानांचा मृत्यू झाला.

 

लष्काराच्या प्रशिक्षणासाठी देशातले हे सर्वात महत्वाचे महाविद्यालय मानले जाते. युद्ध काळात आणीबाणीच्या परिस्थितीत पूल बनवणे, लष्काराला मार्ग तयार करून देणे अशी अत्यंत महत्वाची कामे हे जवान करत असतात. संस्पेशन ब्रिज बनविण्याचा सराव सुरू होता. त्यामध्ये सर्व जवान व्यस्त होते. त्याचवेळी एका बाजूला उभा केलेला टॉवर कोसळला आणि त्याखाली दोन जवान अडकले गेले. सकाळी ११.३०च्या सुमारास हा अपघात झाला आहे.