विनापरवानगी आंदोलन केल्याने आंबेडकरांना नोटीस

    दिनांक  26-Dec-2019 12:10:58
|


asf_1  H x W: 0

 


मुंबई : २६ डिसेंबरला बहुजन विकास आघाडीने मुंबईमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध मोर्चाचे आयोजन केले होते. प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्यांना तशाप्रकाराची नोटीस मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. 'मुंबईत कुठल्याही मोर्चा किंवा आंदोलनाला पोलीस परवानगी नाही." अशी माहिती पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली आहे.

  

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. देशभरात सीएए विरोधात निर्दशने केली जात आहे. यामार्फत सामान्य जनतेपर्यंत चुकीची माहिती पोहचवण्याचे काम काही नेते करत आहेत. देशामध्ये विरोधापेक्षा समर्थनार्थ अनेक नागरिक समोर येत आहेत. अनेक शहरांमध्ये परवानगी घेऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लोक पुढे येताना दिसत आहेत.

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.