पाकड्यांना चोख उत्तर ; २ पाकिस्तानी सैनिक ठार

26 Dec 2019 14:12:33


asf_1  H x W: 0


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी गुरुवारी चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारताने जबाबी कारवाई करत त्यांचे २ सैनिक ठार केले. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून बुधवारी करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता. याव्यतिरिक्त एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला होता. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रतित्त्युतर देण्यात आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जारी केलेल्या वृत्तानुसार भारताच्या कारवाईमध्ये त्यांचे दोन सैनिक मारले गेले होते. त्याआधी पाकिस्तानच्या सैनिकांनी उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेलगत गोळीबार करत उखडी तोफा डागल्या होत्या. यामध्ये १ जवानासह महिलेलाही मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. तंगधार आणि कंजलवाड परिसरात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

Powered By Sangraha 9.0